Post 1



मंथन
 
मंथन तळ ढवळला सागराचा 
आणि पुरते शोधले 
शोधण्या अमृत गेलो 
जहर भलते शोधले

 खंजिराची पात हृदयी 
कळ असे ना वेदना 
व्रण कधी ना भरुन आला 
मलम जरी ते शोधले


 अंधश्रद्धा ही म्हणा
 किंवा म्हणा आशा खुळी 
माझीया हृदयात दडले
 देव जर ते शोधले

 दानवाच्या दर्शनाने
 मी किती धास्तावलो
 आरशातुन बिंब माझे 
मी कितींदा शोधले 

दानवांचा मी ऋणी 
त्यांच्या मुळे कळले मला 
धृवतारा मीच माझा
व्यर्थ जग ते शोधले

 नाम २२ जानेवारी २००७

Blog

  Blog bookmark https://nurtureonesgraphics.blogspot.com/