माणसांच्या ओळखी अन ओळखीची माणसे , हे सूत्र मनात आल
की चित्र फीती सारखे चेहरे नजरे समोरून सरकतात. आभासी
जगात तर सतत नवीन चेहऱ्यांची भर पडत असते. पण लक्षात राहाणारे
सर्व असतात च अस नाही, प्रत्येकाच वेगळे वैशिष्ट ,वेगळे गुण.
ठसा उमटवतात माणस आपल्याही नकळत . आपल्या मनाच्या
इवल्याश्या कोपऱ्यात घर करतात माणसं. व्यापून टाकतात आपल्या
नेणीवा! ना संभाषण, ना लेखी संदेश ,तरीही भारुन टाकतात माणसं!
हृदयाने विचार करणारी ही असतात माणसच .कधी तरी मार्गदर्शक ही होतात. यातील काही स्फूर्तिस्थान बनतात यांच्याही नकळत आपण धड़े गिरवतो .आपल्यातील सर्जनशीलतेला खत पाणी घालतात माणसं ,कौतुकाची थाप ही देतात माणसं!
आपलं सवेंदनशील मन हे टीपत असत , सर्वांसाठी
मनात असते एक हळवी कृतज्ञता ,ती व्यक्त करावी हा भाव!
आणि मग आभासी जगातील हां सच्चेपणा खऱ्या जगात का नाही?
हा पण विचार येतो मनात . या सर्व गुणी मैत्रा बरोबरचा प्रवास
अखंड नेटका व्हावा ,हेच अपेक्षित ,हेच वचन आणि मागणं!
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे!🌹
प्रेम दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!
14.2.2022
© Neeta Jaywant